आमच्याबद्दल
एक्सपायलट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड
एक्सपायलट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ही पशू खाद्य क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, आम्ही शेतकऱ्यांसाठी दर्जेदार आणि पोषणयुक्त पशुखाद्याचे उत्पादन आणि वितरण करतो. आमचा उद्देश शेतकरी बांधवांच्या जीवनात सुधारणा आणणे, त्यांचे उत्पादन वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे.
आमच्या उत्पादनांमध्ये मका भरडा, तूर चुनी, हरभरा चुनी, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, उडीद डाळ, DDGS (किसन गोल्ड सप्लिमेंट) अशा विविध प्रकारच्या पोषणयुक्त पशुखाद्यांचा समावेश आहे. प्रत्येक उत्पादन शाश्वततेला आणि दर्जाला प्राधान्य देत तयार केलेले आहे, जे जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि प्रभावी आहे.